शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत; पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

0
166

पुणे : शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी त्यावर भाष्य केलं.

शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे असे शब्द वापरणं चुकीचं आहे, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.

“मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली. पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत,” असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. सोलापुरातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

“गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचं उद्या पुण्यात आंदोलन”

“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना”- गोपीचंद पडळकर

राज ठाकरेंसोबत जाण्याची आमची इच्छा होती पण…; देवेंद्र फडणवीसांच वक्तव्य

टेस्टिंग वाढवा, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना मदत करा; फडणवीसांचं राज्य सरकारला आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here