आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना, जनतेने मला कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे असेच मला वाटते, असं म्हटलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.
मी मुख्यमंत्री नाही असे मला वाटतच नाही, असे विधान फडणवीसांनी केले. तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका., असा टोला नवाब मलिकांनी फडणवीसांना लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.
विरोधी पक्षनेतेपदही तेवढेच मोठे आहे. दोन वर्षांपासून फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाही. ते आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेतच काम केले पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढले पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद मुख्यमंत्रीपदापेक्षा कमी नाही, हे त्यांना कळले पाहिजे, असं नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंचे शिलेदार फडणवीसांच्या भेटीला, मनसे-भाजप युती होणार?; चर्चांना उधाण
भाजपचा महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका; पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
देवेंद्र फडणवीस म्हणाले मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही; पंकजा मुंडे म्हणतात…
भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का; मराठवाड्यातील ‘या’ माजी मंत्र्यांचे बंधू भाजपच्या वाटेवर