मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं- जयंत पाटील

0
156

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं, असं जयंत पाटील म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान, प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला आहे. त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे,” असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

निकोलस पूरन-ग्लेन मैक्सवेलची शानदार फलंदाजी; पंजाबची दिल्लीवर 5 विकेट्सनी मात

दुर्गा अष्टमीपर्यंत ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन अटळ; पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा

पंतप्रधानांनी देश विकायला काढलाय ; प्रकाश आंबेडकरांची नरेंद्र मोदींवर टीका

शेतकऱ्यांचा दसरा तर अश्रूत गेला, त्यामुळे…; पंकजा मुंडेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here