फडणवीसजी लूज बॉलवरच मोठी विकेट जाते; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

0
166

नवी दिल्ली : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या ठिकाणी मला फटकेबाजी करायला मजा येते, असे सूचक वक्तव्य केले होते. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.

देवेंद्र फडणवीस यांनी लूज बॉलवर फटकेबाजी जरूर करावी. पण मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लागावला आहे. ते शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणावरुन संजय राऊत यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या. सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना रश्मी शुक्ला यांनी लहान पक्षाच्या आमदारांना भाजपसोबत जाण्यासाठी धमकावले होते. तरीही महाविकासआघाडीची सत्ता आल्यावर पाच ते सहा महिने त्या पदावर कशा राहिल्या, याचं मला आश्चर्य वाटतं, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”

पुण्यात लाॅकडाऊन नाही, 30 एप्रिलपर्यंत शाळा, काॅलेज बंद राहणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी- रूपाली चाकणकर

पोलिस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अजित पवारांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here