“फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला”

0
190

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीमध्ये गृहसचिवांना बदल्यांच्या रॅकेट संदर्भात एक अहवाल सादर केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अहवालाची संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. फडणवीस दिल्लीला येताना गृह सचिवांकडे बॉम्ब घेऊन आले होते. पण तो लवंगी फटाका असून त्याला वातही नाही, असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आल्याचं कळलं, ते बरोबर कोणतातरी कागद घेऊन आल्याचंही ऐकायला मिळालं. पण त्या तथाकथित अहवालामध्ये काडीचाही दम नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्याबरोबरच तो अहवाल जाहीर करा, ते वाचल्यानंतर कळेल की सरकारला अडचणीत आणेल असं त्यामध्ये काहीही नाही., असंही राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकासआघाडी सरकारने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं- देवेंद्र फडणवीस

“सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण”

हे सरकार कधीच महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here