मुंबई मॉडेल पचत नसल्यानेच फडणवीस खोटी माहिती पसरवत आहेत- नवाब मलिक

0
135

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केलं असून, यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?, असे प्रश्नही उपस्थित केले आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्रं लिहून कोरोनाच्या मुंबई मॉडेलची पोलखोल केली आहे. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या मुद्द्यावरून पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली आहे. मुंबई मॉडेल पचत नसल्यानेच फडणवीस खोटी माहिती पसरवत आहेत, असा हल्लाबोल नवाब मलिकांनी यावेळी केला.

दरम्यान, नवाब मलिक यांनी एका व्हिडीओद्वारे देवेंद्र फडणवीस यांचे मुद्दे खोडून काढतानाच त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जगभर महाराष्ट्राच्या कामाची लोक नोंद घेत आहेत. मुंबई मॉडेलची चर्चा होतेय हे पचत नसल्यानेच देवेंद्र फडणवीस हे सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

डिअर राजीव, वुई विल मिस यू; राजीव सातव यांच्या निधनावर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना

राजीव सातव तू हे काय केलंस?, तुला कोणत्या शब्दात श्रद्धांजली वाहू; संजय राऊत भावूक

महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला; शरद पवारांकडून राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण

राजीव सातव यांच्या आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला; देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली अर्पण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here