देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला भाजपकडून 100 कोटींची ऑफर; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

0
534

सातारा : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला भाजपकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. ते शनिवारी साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. त्याचबरोबर तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपाकडून 100 कोटी रुपये खर्च केले जातील, असंही मला सांगण्यात आले होतं, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

दरम्यान, त्यावेळेस मी ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहिन. उदयनराजे हे भाजपात जात असतानाही मला ऑफर आली होती,” असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण”

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

“बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये”

या देशाला भारत नाही हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे- संभाजी भिडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here