पुणे : फडणवीस आणि मी दोघे एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज होते” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोलबाजी केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आलेल्या 200 ऑक्सिजन बेडयुक्त रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतः खर्च करुन हे रुग्णालय उभं केलं आहे, त्याचं अभिनंदन. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या उपचारासाठी अडचण नको म्हणून हे रुग्णालय आहे. उद्या कुठल्याही नागरिकाला बेड उपलब्ध नाही, असं होता कामा नये, त्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे” असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मोदी सरकारची अवस्था ही घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारूड्यासारखी- प्रकाश आंबेडकर
परीक्षा तर होणारच; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
ठाकरे सरकार राज्यपालांचे पंख छाटण्याच्या तयारीत- नितीन राऊत
अन्यथा पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल; काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याचे वक्तव्य