Home महाराष्ट्र महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झालं- प्रकाश जावडेकर

महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झालं- प्रकाश जावडेकर

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळालं आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झाले. भविष्यात त्यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जावडेकरांनी शिवसेनेला दिला आहे. तसेच कृषी कायद्यांबाबत 95 टक्के शेतकऱ्यांना कसलीही समस्या नाही. 5 ते 10 टक्के शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. तो आम्ही लवकर दूर करू., असंही जावडेकर म्हणाले.

दरम्यान, पंजाबमध्ये सरकारकडून सर्वात जास्त धान्य खरेदी झाली. मात्र, तेथील शेतकऱ्यांचा हमीभावाविषयी गैरसमज झाला आहे. अनेकदा गैरसमज दूर करायला वेळ लागतो. पण उद्याच्या बैठकीत सगळे गैरसमज दूर होतील, असा विश्वास जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी-

दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे- अण्णा हजारे

मिशेल स्वीपसनची शानदार गोलंदाजी: ऑस्ट्रेलियाची भारतावर 12 धावांनी मात; भारताने मालिका जिंकली

प्रत्येक जातीची जणगणना व्हावी- रामदास आठवले

“शिवसेना ही शरद पवारांच्या चरणी लीन झाली आहे; प्रवीण दरेकरांचा टोला