Home महाराष्ट्र “सगळं नीट “ठरलंय” ना?…नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा...

“सगळं नीट “ठरलंय” ना?…नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही!”

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीत बांधकाम क्षेत्रासाठी काही सवलती राज्य सरकारकडून जाहीर केल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

विकासकांना प्रिमियममध्ये सूट देण्याची फाईल आज पुन्हा मंत्रीमंडळात येणार असे समजतेय…पण सगळं नीट “ठरलंय” ना? काँग्रेसचं मन वळलंय ना? नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही! आमचा सवाल एवढाच आहे घरं घेणाऱ्या सामान्य मुंबईकरांना फायदा होणार का? असं ट्विट करत शेलार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

प्रिमियमच्या सूटीची खैरात बिल्डरला वाटाल आणि घरं घेणाऱ्यांची स्टॅम्पड्युटी विकासक भरेल अशी फसवी अट टाकाल तर खबरदार! घरांच्या किंमती वाढवून स्टॅम्पड्युटी विकासक भरेल, असा “हातभट्टीचा”व्यवहार करुन सामान्य मुंबईकरांना फसवलत तर आम्ही त्याचा जाब विचारतच राहू!, असं म्हणत शेलारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का?; शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

“शिवसेनेला रोखण्यासाठी चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपची काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी”

मोठी बातमी! मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

भाजपात खरी ताकद असेल तर…; अमोल मिटकरी यांच भाजपला आव्हान