“शिवसेनेचा इतिहास सर्वांना माहीत आहे, शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाहीत”

0
520

मुंबई : पाठीत खंजीर खुपसणाऱ्याचे नाव घेतले तर सर्वात आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांत पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. महाराष्ट्रापुढे खूप मोठी कामे आहेत. देशात पहिल्या पाचमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव येत आहे, हे विरोधी पक्षातील नेत्यांचे दुःख मी समजू शकतो., असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे, शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाही. असे प्रकार बाळासाहेबांपासून ते उद्धव ठाकरेपर्यंत कोणी केले नाहीत. बंद दाराआड काय झालं होतं आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले या चर्चेत आता आम्ही जात नाही, महाराष्ट्रातलं वातावरण आता वेगळे आहे आणि या जनतेला मदतीची गरज आहे, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“बिग बाॅस विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन”

“सांगलीत जयंत पाटील पुन्हा करेक्ट कार्यक्रम करणार?; जयंत पाटील-चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा लढत”

“जे फडणवीसांना जमलं नाही, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं, मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांना झटका”

मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू – नाना पटोले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here