“राज्यभरातील शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार; जयंत पाटलांची मोठी घोषणा”

0
240

मुंबई : बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही समाज कंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतला. या घटनेमुळं राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत मोठा निर्णय घेतला आहे.

कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या, दिनांक 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील. , अशी घोषणा जयंत पाटलांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. उद्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील, असं ट्विटरवरून जयंत पाटलांनी घोषीत केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“नारायण राणे ज्या पक्षात जातात, त्यांची सत्ता जाते, त्यामुळे भाजपलाही धोका होऊ शकतो”

निवडणूक आल्यानंतर उसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला

“रूपाली पाटील यांच्या राष्ट्रवादीत येण्यानं रूपाली चाकणकर नाराज?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here