कोल्हापूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जनगणनेबाबत एक मोठी मागणी केली आहे. प्रत्येक जातीची जणगणना व्हावी, असं मत रामदास आठवले यांनी मांडलं आहे.
महाराष्ट्रातील काही नेते आणि विचारवंतांकडून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्याला आपला विरोध असल्याचं रामदास आठवले म्हणाले. समाजातून जातीव्यवस्था संपवा, मग आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली आहे.
दरम्यान, अनेक जातींवर आजही अन्याय होतो, त्यामुळे जातीच्या आधारावरच आरक्षण असलं पाहिजे असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“शिवसेना ही शरद पवारांच्या चरणी लीन झाली आहे; प्रवीण दरेकरांचा टोला
मैथ्यू वेड-ग्लेन मैक्सवेलची आक्रमक फलंदाजी; ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य
शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा- निलेश राणे
महत्वाची बातमी!”मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध खरेदीसाठी नागरिकांची गर्दी”