आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : कोपरगाव येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यात साईसंस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा येत्या 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. तालुक्यातील महिला बचतगटांना 39 लाख 55 हजार रुपयांचे कर्जवितरण करून या वाढदिवसाच्या पूर्वतयारीला आम्ही प्रारंभ केला आहे. ते पंतप्रधान व्हावेत, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा अशी माहिती आशुतोष काळे यांनी दिली.
हे ही वाचा : “बिघाडी सरकारला सत्ता हवी, मात्र जनतेच्या प्रश्नांना तोंड देण्याची हिंमत नाही”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत आणि कामगारांपासून ते शेतमजुरांपर्यंत सर्वच घटक मोठ्या संकटात आहेत. या अडचणींतून देशाला प्रगतीकडे नेण्याची क्षमता केवळ शरद पवार यांच्यात आहे. प्रत्येक आपत्तीतून देशाला वाचवण्यासाठी पवारांचे मार्गदर्शन उपयोगी पडते, असं अशुतोष काळे म्हणाले आहेत.
केंद्रात कुठल्याही पक्षाचे सरकार असले, तरी त्यांचा सल्ला घेतला जातो. हे त्यांच्या नेतृत्वाचे मोठेपण आहे. केंद्रात काही निर्णय चुकीचे झाल्याने अर्थव्यवस्थेची गती मंदावली. देशाची विस्कटलेली घडी ते पुन्हा बसवू शकतात. पक्षाचे विचार घराघरांत पोचविण्याचे व आगामी निवडणुकांत पक्षाला विजय मिळवून देऊन त्यांना वाढदिवसाची भेट देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असंही अशुतोष काळे यांनी म्हटलं आहे.
दरमयान, या मेळाव्याला पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेन सरडे, वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, पक्षाचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी, कारभारी आगवण, पद्मकांत कुदळे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, रमेश गवळी, कृष्णा आढाव, नवाज कुरेशी, प्रतिभा शिलेदार, रेखा जगताप, वैशाली आभाळे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
2024च्या लोकसभेत भाजपा 418 जागांच्या खाली येणारच नाही; चंद्रकांत पाटलांटा दावा
पुण्यातील मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांची राज ठाकरेंबद्दल भावनिक पोस्ट, म्हणाले…
ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करणं हे राज्य सरकारचंच काम, केंद्र सरकारचं नाही- प्रीतम मुंडे