मुंबई : भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्याचे त्यांच्या लक्षात यायला हवे होते, असं म्हणत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधडय़ा भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती. दादामियां, हे ध्यानात ठेवा, असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.
भाजपच्या वागण्या बोलण्यात तसा काही अर्थ उरला नाही. भाजपचे दादामियां हेसुद्दा आता फडणवीसांच्या पावलावर पाऊल ठेऊन नको तिथे जीभ टाळ्यास लावत आहेत. असं म्हणत शिवसेनेनं चंद्रकातं पाटलांवर टीका केली आहे.
दरम्यान, औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे, असं वक्तव्य चंद्रकात पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्यावर शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून पाटलांचा समाचार घेतला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेना क्रमांक एकचा पक्ष राहिलाच पाहिजे- अजित पवार
“आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत, पण…”
तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा; चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर पलटवार
शिवसेना औरंगाबादचे रक्षण काय करणार? औरंगाबादचे रक्षण भाजपच करू शकते- चंद्रकांत पाटील