Home महाराष्ट्र “देशमुखांचं समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं झालं”

“देशमुखांचं समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं झालं”

मुंबई : सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका महाविकास आघाडी सरकार आणी अनिल देशमुख यांनी केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याच पार्श्वभूमीवर  भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

बारमालकांकडून वसुली करणाऱ्या अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून हायकोर्टाने त्यांचे कायद्यापासून पळण्याचे मार्ग बंद केले आहेत. देशमुखांचं उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही तोंड काळं झालंय. वसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली आहे, असं अतुल भातखळकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई हायकोर्टाने  अनिल देशमुख यांनी केलेली याचिका फेटाळली आहे. मिस्टर इंडिया आता तरी प्रकट होतील अशी अपेक्षा आहे, असा टोलाही अतुल भातखळकरांनी यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात पूरस्थिती; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…

मोठी बातमी! खडकवासला 100 टक्के भरण्याच्या मार्गावर, पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचं संकट मिटलं

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 42 फुटांवर जाण्याची शक्यता

“महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनंच न्यायालयात दिलं”