मुंबई : शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. स्व. बाळासाहेब ठाकरेंनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्दही पाळला होता, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं.
शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही. परंतु महाराष्ट्रात शिवसेनेला अनेक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच असल्याचं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जेंव्हा जनता पक्षाचं राज्य आलं आणि काँग्रेसचा पराभव झाला त्यावेळी काँग्रेसला पाठींबा देण्यासाठी शिवसेना हाच पक्ष पुढे आला. त्यांनी इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकांमध्ये एकही उमेदवार उभा करणार नसल्याचा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो याचा तुम्ही विचार करा. पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची कधीही चिंता केली नाही. त्यांनी इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द निवडणुका न लढवता पाळला, असं शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“अखेर ठरलं! नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव”
…त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती आणखी चांगली असती- जयंत पाटील
“शिवसेनेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं पाहिजे, वाट लावली मुंबईची”
“वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची”