Home नाशिक “पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ ‘भाजपशी’ हे सरकारनं लक्षात...

“पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ ‘भाजपशी’ हे सरकारनं लक्षात ठेवावं”

नाशिक : यंदाही आषाढी वारी एसटी बसनेच जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावर्षी प्रमुख पालखी सोहळ्यात जास्त लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली असून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावर भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी प्रतिक्रिया दिली.

यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नसून राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील, असा इशारा तुषार भोसले यांनी यावेळी दिला.

दरम्यान, मी स्वत: यंदा पायी पंढरपूरला जाणार आहे. वारकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपशी आहे, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे., असंही तुषार भोसलेंनी म्हटलं. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊतांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू; नाना पटोलेंचा टोला

अखेर कोरोना लसीचा पहिला डोस घेतला; अमृता फडणवीसांनी फोटो शेअर करत दिली माहिती

“वाघ हा वाघच असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर फक्त वाघाचं राज्य”

“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला दिलेली धमकी”