Home महाराष्ट्र “नारायण राणेंना पंतप्रधान केलं, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचं कारण नाही”

“नारायण राणेंना पंतप्रधान केलं, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचं कारण नाही”

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेते नारायण राणे यांची नुकतीच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रिपदी वर्णी लागली. पदभार स्वीकारल्यानंतर राणेंंनी नोंदबुकमध्ये ‘ओम श्रीगणेशा’ लिहित आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

आपल्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या, मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर ते एवढ्या मोठ्या मनाचे नाहीत, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नारायण राणे यांचा शिवसेनेकडे आणि खास करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे, तो आजही बदललेला नाही, याच गोष्टीचं दुःख वाटतं, अशी खंत विनायक राऊतांनी यावेळी व्यक्त केली.

राणेंना सूक्ष्म उद्योग मंत्री करा, अतिवरिष्ठ मंत्री करा किंवा थेट पंतप्रधान करा, शिवसेनेला दुःख वाटण्याचं कारण नाही. भाजपला राणेंना मंत्रिपद द्यायचं होतं, ते त्यांनी दिलं, आता तिथे सुखाने रहा. त्या खुर्चीवर बसून पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका, असा टोला विनायक राऊतांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

…तर मी विधानसभा अध्यक्ष होण्यास तयार, पण शिवसेनेनं वनमंत्रीपद सोडू नये- भास्कर जाधव

मी काही मोठी नेता नाही, त्यामुळे भाजपला मला संपवायचं आहे, असं वाटत नाही- पंकजा मुंडे

“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्व भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी संपवलं”

“एकनाथ खडसेंची सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चाैकशी, ते ईडीला घाबरत नाहीत”