मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत संपर्क केला आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.#MaharashtraRains #MaharashtraFloods #Flood @narendramodi @AmitShah pic.twitter.com/R3Ctp8lh8o
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“राज्यात पूर आलाय तरीही उद्धव ठाकरे घरात, त्यांनी आता घराबाहेर पडावं”
पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका टाळण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे- जयंत पाटील