Home महाराष्ट्र “राज्यात पूर आलाय तरीही उद्धव ठाकरे घरात, त्यांनी आता घराबाहेर पडावं”

“राज्यात पूर आलाय तरीही उद्धव ठाकरे घरात, त्यांनी आता घराबाहेर पडावं”

अहमदनगर : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्यात पूर आलाय तरीही मुख्यमंत्री घरात आहेत. त्यांनी आता घराबाहेर पडावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आम्ही काही बोललो तर राजकारण करून नका म्हणतात. अशा काळात विरोधकांनी सरकारच्या हातात हात देऊन काम केले पाहिजे हे खरे आहे. पण त्यासाठी सरकारचा हात तर दिसला पाहिजे आम्ही त्यासाठी हात द्यायला तयार आहोत, पण सरकारचा हात तर दिसू द्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

सध्या राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून आहेत, त्यांचे मंत्रीही कोठे मदतीला धावले दिसत नाहीत, मंत्र्यांनी बाहेर पडावे, चिपळूणला जावे, तेथे मदतीची गरज आहे. ते सोडून केवळ दादागिरीची भाषा करत आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

न्यूड ऑडिशनला नकार दिल्यानं, मला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका टाळण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे- जयंत पाटील

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलंय, त्यामुळे..; राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना संदेश!

“कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील”