Home महाराष्ट्र दाऊदच काय त्याच्या सात पिढ्या जरी खाली आल्या तरी मातोश्रीचं वाकडं करु...

दाऊदच काय त्याच्या सात पिढ्या जरी खाली आल्या तरी मातोश्रीचं वाकडं करु शकणार नाहीत- एकनाथ शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी दाऊद इब्राहिमच्या हस्तकानं केल्याची माहिती समोर आली आहे. यावर शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मातोश्री हे मराठी माणसाचं श्रद्धास्थान आहे. मातोश्री कडे वाकड्या नजरेने बघणारा अजून पैदा झालेला नाही…दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मातोश्रीचं वाकडं करु शकणार नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

याआधीही पाकिस्तानने शिवसेनाप्रमुखांना धमकी दिली होती, पण पाकिस्तान कोणाच्याही केसाला धक्का लावू शकलं नाही आणि शिवसेना अशा कोणत्याच धमकीला घाबरली आणि नाही घाबरणार, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

डायरेक्ट दाऊदची धमकी, आता तरी घरातून बाहेर निघा मुख्यमंत्री साहेब- नितेश राणे

माझी ताकत काय आहे ते 105 आमदार असूनही विरोधी पक्षांमध्ये बसलेल्यांना विचारा- संजय राऊत

दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

“मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन; मातोश्री उडवून देण्याची दिली धमकी”