“भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही”

0
3

मुंबई : उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ऑफिससाठी नवी जागा विकत घेतल्याचं समोर आलं होतं. यावरुन  कंगना रणौतने ट्विट करत उर्मिला मातोंडकरांना लक्ष्य केलं. कंगनाच्या याच ट्विटवर बोट ठेवत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधलाय.

भाजपला खूश करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा आणि भाजपाचं हे मोठं षडयंत्र होतं, याचा हा कबूलीजबाब आहे. भाजपाने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

दरम्यान, भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे, अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं. त्यावरून  सचिन सावंत यांनी कंगनाला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मनसेतही मेगा भरती सुरू; ‘कृष्णकुंज’बाहेर लोकांची गर्दी

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल

‘त्यांना चपलेने मारायचं’; जुना व्हिडिओ पोस्ट करत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेनं ठरवावं- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here