पश्चिम बंगालमध्ये भाजपने संपूर्ण ताकद लावली तरी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल- संजय राऊत

0
193

मुंबई : देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूका होत आहे. यापैकी सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यावर शिवसेना नेता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत देशातील चार राज्यांच्या निवडणुका या राजकारणाच्या भविष्याची दिशा ठरवणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, या देशात नेहमीच लोकशाहीवर हल्ले होत आले आहेत, ही पहिली वेळ नाही. याविरोधात जनता, विरोधी पक्ष लढले आहेत, म्हणूनच लोकशाही जिवंत आहे. ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं असून आम्ही त्यावर विचार करु, असंही राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी! शिवाजी विद्यापिठाला नॅक मानांकन

“तृप्ती देसाई यांची पीडितेसह पत्रकार परिषद, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचे आरोप”

“दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर”

“शरद पवारांच्या प्रकृतीविषयी मर्यादा सोडून टीका केली तर…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here