“भाजपनं प्रचारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना जरी आणलं तरी शिवसेना घाबरत नाही”

0
500

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिल्वासा : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना आज भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

‘रेल्वेमंत्री प्रचाराला येत आहेत, इतर मंत्रीही येतील, हवे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रचाराला आणा, शिवसेना घाबरत नाही, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. ते दादरा नगर हवेलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : “मुख्यमंत्री साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना”

रेल्वेमंत्री गेल्या चार दिवसांपासून सिल्वासामध्ये येऊन बसले आहेत. रेल्वे मंत्रालयाला काहीच काम नाही का ? की एअर इंडियासारखा लिलाव करून टाकला आहे? भाजपनं दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जो बायडन यांना आणावं. पश्चिम बंगालमध्ये केंद्रातले संपुर्ण मंत्रीमंडळ विधानसभा निवडणूकीसाठी उतरले होते. पण ममता बॅनर्जींसमोर भाजपचे काहीच चालले नाही. त्याच पद्धतीने सिल्वासामध्ये भाजपचे काहीही चालणार नाही. सातवेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला सहानभूतीची गरज नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा माझा निर्णय योग्यच; शरद पवारांचं मोठं विधान

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाला समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेत नव्या वादाला सुरूवात; ‘या’ कारणामुळे दोन्ही पक्ष आमने-सामने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here