आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होऊनही एक महिना होत असला तरी, अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही.
तसेच मंत्रीमडळ विस्तार कधी होणार, असे सवाल विरोधी पक्षाकडून सातत्याने होत आहेत. अशातच आता शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी एक मोठं विधान केलं आहे.
हे ही वाचा : संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता; संजय शिरसाट यांचं मोठं विधान
“शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुध्दा भाजप आणि अपक्ष मिळून सरकार बनवू शकतो. त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही, असं बच्चू कडू म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीश बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन मंत्र्यांचे सरकार सध्या राज्यात आहे. हे आजच नाही तर यापूर्वीही असे सरकार सत्तेत होते. त्यामुळे दोघेही राज्य सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्यासमोर अनेक अडचणी असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांनी नाही, तर फडणवीसांनी कटकारस्थान रचलं, आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली”
मोठी बातमी; संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड
‘राज्यपालांच्या वक्तव्याशी मी…’; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं