निवडणुकांपूर्वीच अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

0
286

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यापैकी 43 ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीने पुणे आणि जळगावात अनेक ग्रामपंचायतींवर बिनविरोध झेंडा फडकवला आहे.

पुणे जिल्ह्यातही एकूण 221 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यामध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर भाजपला फक्त एकाच जागी बिनविरोध जागा जिंकता आली आहे.

हे ही वाचा : खुजगाव ग्रामपंचायत निडणुकीमधे “शिट्टी” वाजण्याची दाट शक्यता…

तर दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यात 140 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.  त्यापैकी 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक 9 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

 हिवाळी अधिवेशनानंतर शिंदे-भाजप सरकार कोसळणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

“मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर, वसंत मोरेंच्या ‘या’ कट्टर समर्थकानं शिंदे गटात केला प्रवेश”

“उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यांनी पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here