पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील उपक्रमशील आणि तंत्रस्नेही शिक्षक रणजित सुदामराव बोत्रे यांना महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदर पुरस्कार कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी डी.एस. हायस्कूल, सायन मुंबई येथे पार मोठ्या उत्साहात पडला.
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, निष्ठावान सेवा, कामातील शिस्त, प्रामाणिकपणा या बाबींचा विचार करून सदर पुरस्कारासाठी रणजित बोत्रे यांची निवड करण्यात आली आहे. त्याबरोबर रणजित बोत्रे प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम, नवोपक्रम राबवित असतात.

