मुंबई : दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं आहे. तसेच आपण स्वत: देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोरोनाला सणवार-दिवाळी कळत नाही. लस जेंव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे., असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्याला दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु करायचे आहेत. पूर्ववत आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे या दिवाळीतही मास्क घालणे- हात धुणे- अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळा आणि आता हा हिवाळा असल्याने श्वसन रोगाला आमंत्रण देऊ नका, आपले आई वडील, ज्येष्ठ मंडळी घरात आहेत याची जाणीव ठेवा., असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हा दीपोत्सव असल्याने दिव्यांची आरास, रांगोळ्या, ज्यांना शक्य आहे त्यांनी अंगणात किल्ले करणे, या काळात सुट्या असल्याने वाचन करणे, संगीत तसेच इतर आवड पूर्ण करा. तुमच्या घराचे दरवाजे मंगलमय शांती, समृद्धी, लक्ष्मी यांच्यासाठी उघडा, कोरोनासारख्या रोगासाठी नव्हे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“अर्णब गोस्वामी यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर”
…तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे- बच्चू कडू
“ठाकरे सरकार काही 4 वर्षे चालणार नाही, तसंच पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल”
“सांगलीत तरूणाच्या डोक्यात दगड घालून खून”