भारत-इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने शानदार विजय मिळवला.
4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून चेन्नईच्या मैदानावर सुरू होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट याने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने दुसऱ्या कसोटीसाठी संघातील बदलांबद्दल माहिती दिली.
वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संघाबाहेर जाणार हे अपेक्षित होते, पण जोफ्रासोबत पहिल्या कसोटीत डाव पलटवणारा जेम्स अँडरसन यालाही संघातून बाहेर करण्यात आलं आहे. अँडरसन बरोबरच पहिल्या कसोटीत 5 विकेट्स घेणारा फिरकी गोलंदाज डाॅम बेस, विकेटकीपर जोस बटलर यांनाही संघातून वगळण्यात आलं आहे.
दरम्यान, या 4 खेळाडूंच्या जागी बेन फोक्स, मोईन अली, स्टुअर्ट ब्राॅड, ओली स्टोन या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी
“राज्यपालांसारखाच मंत्रिमंडळालाही मान, एका हाताने टाळी वाजत नाही”
मनसे-भाजप युतीवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…
“राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत सगळे विरोधक एकसूरात टिका करतायेत, पण…”
“कर्जत तालुक्यामध्ये रोहित पवारांचं वर्चस्व, तब्बल 47 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात”