मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आव्हाड यांच्यासमोर त्यांच्याच बंगल्यावर नेऊन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप एका तरुणानं केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी केलेल्या आवाहनावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. आव्हाडांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल अत्यंत घाणेरडी पोस्ट केली होती.
तरुणाने केलेल्या तक्रारी नुसार त्याच रात्री दोन गणवेशधारी आणि दोन विना गणवेशातील पोलिसांनी त्याला आव्हाड यांच्या बंगल्यावर नेलं. त्यानं प्रश्न विचारला असता त्याला आव्हाडांच्या बंगल्यावर नेत असल्याचं सांगण्यात आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर काही लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हेदेखील उपस्थित होते.
दरम्यान, ती पोस्ट डिलिट करायला लावली. त्यानंतर माफीचा व्हिडीओ तयार करण्यात आल्याची माहिती त्यानं दिली. यानंतर त्यानं वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
महत्वाच्या घडामोडी-
तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा; देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
“मूर्खांन सोबत सरकार चालवता चालवता अजित पवारांना लोकं पण मूर्ख वाटायला लागली की काय?”
पुढील वर्ष भराचा माझा पगार अन् CM फंडात जमा करा- जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्र उध्दवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो- जितेंद्र आव्हाड