मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजयी केल्यानंतर निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुंबईतील सिलव्हर ओक निवासस्थानी ते भेट घेणार आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आगामी काळात महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवेल, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या भेटीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”
“शिवसेना विश्वास असणारा पक्ष, स्व. बाळासाहेब ठाकरेंनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता”
“अखेर ठरलं! नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव”
…त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती आणखी चांगली असती- जयंत पाटील