98 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड; पुणे अर्बन सेलच्या वतीने केला सत्कार

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डाॅ. तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत. त्यांची निवड झाल्याबद्दल आज पुणे अर्बन सेलच्या वतीने पुणे अर्बन सेलचे प्रमुख व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी सत्कार केला आहे.

दुधाने नेमकं काय म्हणाले?

संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर प्रथमतः दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत असून, या ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. आजवर त्यांनी केलेल्या साहित्य सेवेची ही पोहोच पावती असून याबद्दल आज पुणे अर्बन सेलच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

ही बातमी पण वाचा – निडणुकीच्या तोंडावरअजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामे

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि सरहद, यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्षा मा. खा. वंदनाताई चव्हाण, महाराष्ट्र अर्बन सेलचे सरचिटणीस आदरणीय नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अर्बन सेलच्या सदस्या वृषाली ताई दाभोळकर यांच्या सूचनेतुन हा सन्मान संपन्न झाला. याच वर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून, प्रथमतः दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाची धुरा एक महिला साहित्यिका हाती घेत आहेत. ही नक्कीच अभिमानाची बाब असून याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो, असे दुधाने यांनी सांगितले.

ज्यांच्या सहकार्यातून आज अर्बन सेलच्या सभासदांकरीता हा योग जुळून आला ते सुप्रसिद्ध साहित्यिक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे यांची सुद्धा भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी, महाराष्ट्र अर्बन सेलचे सरचिटणीस आदरणीय नितीन जाधव, पुणे शहर अर्बन सेलचे माजी अध्यक्ष नितीन कदम, पुणे शहर अर्बन सेलचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, पुणे शहर अर्बन सेलच्या सदस्या वृषाली ताई दाभोळकर, कसबा विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, कोथरूड विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष सचिन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपच्या पहिल्या यादीत पुण्यातील तीन आमदारांना पुन्हा उमेदवारी, तर दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट

शरद पवार गटाचे उमेदवार ठरले! संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर; पाहा संपूर्ण यादी

महाविकास आघाडीने CM पदाचा उमेदवार ठरवण्याऐवजी विरोधी पक्षनेता ठरवावा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here