आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : निवडणुका लागल्या की, महाविकास आघाडीतील आमदार भाजपमध्ये येतील, असा दावा केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
महाविकास आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपमध्ये येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं दानवे यांनी यावेळी म्हटलं. यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं.
हे ही वाचा : “MIM नं कोणासोबत जावं हा त्यांचा प्रश्न, आम्ही मात्र स्वबळावर लढणार आणि जिंकणार”
रावसाहेब दानवे केवळ मनोरंजन असून ते स्वप्न पाहत असतात, अशी टीका खडसेंनी केली होती. यावरून आता परत दानवे यांनी खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केलं आहे. एकनाथ खडसे यांच्या कल्पनेत असतील काही मनोरंजन करणारे नेते. पण भाजपचे नेते हे कामे करणारे आहेत. मनोरंजन करणारे नाहीत, असा प्रतिटोला दानवेंनी यावेळी खडसेंना लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
MIM ही भाजपची बी टीमच, आघाडी नाहीच- उद्धव ठाकरे
पाकव्याप्त काश्मीर भारताला कधी जोडताय?- संजय राऊत
MIM ची तुम्हाला प्रस्ताव देण्याची हिंमतच कशी होते?; मनसेचा शिवसेनेला सवाल