एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

0
334

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे कळवण शहराध्यक्ष जितेंद्र पगार यांच्याबरोबर तालुक्यातील माजी पदाधिकाऱ्यांसह काही अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत शिंदे गटात प्रवेश केला.

हे ही वाचा :  “उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”

राष्ट्रवादीचे कळवण शहराध्यक्ष जितेंद्र पगार, माजी उपनगराध्यक्षा अनुराधा पगार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संदीप वाघ, एकलव्य युवक संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार, मातोश्री निर्मलाबाई देशमुख आश्रमशाळेचे अध्यक्ष भूषण देशमुख, समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष हेमंत शेवाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

दरम्यान, शिवसेनेचे कळवण तालुक्यातील पदाधिकारी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असल्यामुळे शिंदे गटात तालुक्यातून शिवसेनेकडून अद्याप कुणीही गेले नाही.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही मला संपवू शकत नाही; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का ; ‘या’ बड्या नेत्याच्या मुलाने केला शिवसेनेत प्रवेश

शिवभोजन थाळी चालू राहणार की बंद?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here