आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेसोबत बंडखोरी कर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. मात्र त्यांना आपल्यासोबत आलेल्या आमदारांच्या नाराजींचा सामना करावा लागत आहे.
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबला आहे. गणेशोत्सवानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दावा शिंदे गटाकडून केला जात होता. परंतु हा विस्तार आणखी लांबणीवर जाणार असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांकडून दिली गेली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदेंची अडचण झाली असून, नाराज आमदार पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याची चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा मोठा डाव; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता जास्तीत जास्त 23 लोकांना मंत्री बनवू शकतात मात्र अपेक्षा ठेवणाऱ्यांची यादी मोठी आहे. याशिवाय भाजपालाही काही मंत्रिपदे द्यावी लागणार आहेत. अशा स्थितीत आमदारांना कसे शांत करायचे, हा एकनाथ शिंदे यांच्यासमोर चिंतेचा विषय आहे.
दरम्यान, जर नाराज आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतले तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेऊ शकतात.
महत्त्वाच्या घडामोडी –
अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीस भेटीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, म्हणाले…
“शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार?”