एकनाथ शिंदे फक्त मुखवटा, राज्य तर देवेंद्र फडणवीसच चालवतात; राष्ट्रवादीची टीका

0
236

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे वाचून दाखवू का असं विचारत आहेत आणि त्यावर देवेंद्र फडणवीस त्यांना सांगत आहेत की, वाचून दाखवायची काय गरज नाही. या एकनाथ शिंदे यांच्या व्हिडीओवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : संजय शिरसाट म्हणाले, एकही अश्लील शब्द वापरल्यास राजीनामा देईन, आता सुषमा अंधारेंचा पलटवार, म्हणाल्या…

ज्या अर्थी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे लिहिलेलं वाचून दाखवू का असं जर विचारत असतील तर ते किती दबावाखाली काम करत असतील , असं सांगतानाच एकनाथ शिंदे हे फक्त मुखवटा आहेत, आणि राज्य देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, शिंदे गट भाजपसोबत गेल्यामुळे शिंदे गटाचं तर रेटिंग कमीच आहे पण असंगाशी संग केल्यामुळे भाजपचीही लोकप्रियता घसरली, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

ठाकरेंच्या अडचणीत वाढ; उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, प्रकरण काय?

संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार?; सुषमा अंधारेंनी केली महिला आयोगाकडे तक्रार दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here