आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 50 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. अशातच बंडखोर आमदार शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याची माहीती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे शिंदे गट मनसेत प्रवेश करणार का?, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. अशातच मनसे आमदार राजू पाटील यांनी या युतीबाबत महत्वपूर्ण विधान केलं आहे.
सध्या जे राजकारण सुरू आहे, ते पाहता शिवसेना आणि महाविकास आघाडीचा हा अंतर्गत वाद आहे. त्यामुळे या घडीला आम्हांला त्याच्यात काही रस नाही, असं राजू पाटील यांनी यावेळी म्हटलं.
हे ही वाचा : “… म्हणुन उचललेलं हे पाऊल”; एकनाथ शिंदेंनी केला बंडखोरीमागील खुलासा
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मी राजसाहेबांच्या संपर्कात नाही. प्रसारमाध्यमांच्या मार्फतच मला हे समजले आहे, की राजसाहेब यांना एकनाथ शिंदे यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. त्यांचे पहिल्यापासून एकमेकांशी चांगले संबंध आहेत. मध्ये काही नेतृत्वाच्या अडचणी असतील त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला होता. यावेळी त्यांनी एक कॉल केला असेल., असंही राजू पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी; देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांची वडोदऱ्यात भेट झाल्याची चर्चा
“शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का; शिक्षणमंत्री उदय सामंतही शिंदे गटात सामील”
शिवसेनेतील बंडखोरीवर, ओवेसींची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…