एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना पकडून आणलं

0
169

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत असून आता असाच एक आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एका आमदाराला चक्क एअरपोर्टवरुन पकडून पुन्हा परत आणलं आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी संजय बनसोड आणि बाबासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरला आणलं. राष्ट्रवादीचे हे दोन्ही आमदार मुंबई विमानतळावर होते. या दोन्ही आमदारांना राष्ट्रवादीची बैठक सुरू असलेल्या ठिकाणीच नेण्यात आलं आहे.

मी कुठेही गेलो नव्हतो. मी शरद पवारांसोबतच सोबतच आहे, आसं संजय बनसोडे यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या 54 पैकी 42 आमदारांनीच उपस्थिती लावली. या बैठकीकडे 12 आमदार फिरकले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here