आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
“महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपच्या 5 लोकांना जेलमध्ये टाकणार होते” “पाचवा नंबर हा देवेंद्र फडणवीस यांचा होता”, असा मोठा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
आता मी बोललो ते काही ऐकत नाही. आता त्यांचं सरकारच पलटी करुन टाकलं. नाहीतर भाजपच्या 5 लोकांना जेलमध्ये टाकलं असतं. पाचवा नंबर देवेंद्र फडणवीस यांचा होता. सर्व माझ्याकडे आले, मला म्हणाले ते, म्हटलं मी काय सोडत नाही. मी म्हटलं, विचार करुन करा. कारण दोन लोकं वरती बसलेले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ही बातमी पण वाचा : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर
भाजप नेते गिरीश महाजन यांना मोक्का लावलाच होता. त्यांचं प्लॅनिंग काय होतं बघा. या अशा लोकांना अटक करायची. जेलमध्ये टाकायचं. भाजप बॅकफूटवर जाईल आणि 20 ते 25 भाजपचे आमदार फोडायचे आणि महाविकास आघाडीत घ्यायचे. महाविकास आघाडी मजबूत करायची, असं प्लॅनिंग होतं. आता बोललो, काठावर एकदम आले आहेत. आता थांबलो तर यांचा गेम होऊन जाईल आणि आपला राहून जाईल. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम वाजवून टाकला”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
राज ठाकरेंची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, सत्तेत असताना…
मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात
उद्धव ठाकरे आजारी असताना मी त्यांना…; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सूचक वक्तव्य