आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांसोबत बंडखोरी केली असून शिवसेनेचे अंतर्गत संकट रोज नवे राजकीय वळण घेत आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भाजपाने या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे ही वाचा : मोठी बातमी; देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांची वडोदऱ्यात भेट झाल्याची चर्चा
माध्यमांच्या वृत्तानुसार, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वडोदरा येथे भेट झाल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे त्यावेळी गृहमंत्री अमित शाहदेखील वडोदऱ्यात असल्याची चर्चा होती.
दरम्यान, शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे गुवाहाटीने वडोदराला रवाना झाले होते. अमित शाह आणि फडणवीसांची भेट घेऊन शनिवारी सकाळी 6.45 ला एकनाथ शिंदे गुवाहाटीला परतल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का; शिक्षणमंत्री उदय सामंतही शिंदे गटात सामील”
शिवसेनेतील बंडखोरीवर, ओवेसींची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…
शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊत यांचा दावा