पंकजा मुंडेंशी बंदद्वार चर्चेनंतर एकनाथ खडसे यांची भूमिका बदलली, म्हणाले…

0
554

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

एकनाथ खडसे यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा केली. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ही बातमी पण वाचा : “राजकारणातील सर्वात मोठी बातमी, ‘या’ निवडणूकीसाठी पंकजा मुंडे-धनंजय मुंडे एकत्र आले, निवडणूक बिनविरोधही केली”

एकनाथ खडसेंनी काल माध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपमध्ये अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं म्हटलं होतं. पण आज त्यांनी आपली भूमिका बदलली. पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ नाहीत, असं खडसेंनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे. तसं मी याआधीदेखील बऱ्याचदा येऊन गेलो आहे. मुंडे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मी आलेलो आहे. पंकजा ताई आणि आमचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. या कौटुंबिक संबंधांमध्ये एक भावनिक ओलावा आणि प्रेम आहे. त्यामुळे त्यांची भेट घ्यावी असं मला वाटलं म्हणून मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ओडिशामध्ये द बर्निंग ट्रेनचा थरार, कोरोमंडल एक्सप्रेस, मालगाडीला धडकली, 50 जणांचा मृत्यू, तर 179 जखमी”

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी शिजतंय; शरद पवारांच्या भेटीनंतर आता आशिष शेलार ‘वर्षा’वर दाखल

संजय शिरसाटांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर, आता सुषमा अंधारेंचा, देवेंंद्र फडणवीसांना सवाल, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here