एकनाथ खडसेंचं जाणं नक्कीच चांगलं नाही- सुधीर मुनगंटीवार

0
181

मुंबई : भाजपचे जेष्ठ्य नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसेंनी भाजप सोडणं ही धक्कादायक बातमी आहे. ही पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे. खडसेंसारखा नेता ज्यांनी पक्षाची सेवा केली. मी निशब्द आहे. त्यांनी जाऊ नये असं वाटायचं, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’ असं म्हणत ज्यांनी पक्ष वाढवला त्यांचं जाणं नक्कीच चांगलं नाही, असं मुनंगटीवारंनी म्हटलं आहे.

खूश रहो तुम सदा ये दुवा है हमारी. अन्याय झाला की नाही यावर चर्चेतून, संवादातून मार्ग निघू शकला असता. एकनाथ  खडसे हे संघर्षशील, दिलदार मनाचे नेते आहेत, असंही मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here