एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही- रामदास आठवले

0
174

बारामती : भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणारे नेते एकनाथ खडसे यांनी माझ्या संपर्कात 15-16 आमदार आहेत, असं वक्तव्य केलं होतं. यावर रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले आज अतिवृष्टीग्रस्त बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एकनाथ खडसेंसोबत 15-16 आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. ते आमदार नसल्याने राष्ट्रवादीत जाऊन आमदार होतील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसेंनी रिपाइंमध्ये यावं अशी माझी इच्छा होती. त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांना रिपाइं हा चांगला पर्याय झाला असता. पण ते राष्ट्रवादीत गेले आहेत. ठीक आहे. त्यांना माझ्या कडून शुभेच्छा आहेत, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण”

अहो जनाची नाही तरी मनाची बाळगा; दसरा मेळाव्यावरून अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नागरिकांना मोफत कोरोना लस नाही का?- प्रियांका चतुर्वेदी

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लक्षणं; होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here