मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते एकनाथ खडसे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक वाद चालू आहेत. यावरून शिवसेना प्रवक्ते व राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्यांच्यामुळे भाजपची राज्यात सत्ता आली, त्या एकनाथ खडसेंवर ही वेळ येणं हे दुदैवी आहे. पण एकनाथ खडसेंनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आहे, असा टोलाही उदय सामंत यांनी फडणवीस यांचं नाव न घेता लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खडसेंचं जाहीर युद्ध सुरु आहे. खडसे जर वेगळा विचार करणार असतील, तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपमध्ये खदखद आम्ही निर्माण करत नाही, तर याच खदखदीमुळे भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही उदय सामंत यांनी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी निलेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
…अशा प्रकारच्या गुंडागर्दीने महाराष्ट्राची जनता शिवसेनेला माफ करणार नाही- अतुल भातखळकर
उद्धव ठाकरेजी हा गुंडाराज थांबवा आणि…- देवेंद्र फडणवीस
BSNL चा युजर्ससाठी 49 रुपयांचा जबरदस्त प्लॅन, 2 GB डेटा अन् ….