“एकनाथ खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत यावं”

0
164

मुंबई : एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांनी भाजप सोडून आता शिवसेनेत यायला हवं. आम्ही त्यांचे स्वागत करु, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपची युती तुटली. आता खडसेंनी आमच्याकडे यावं. हवं तर मी मध्यस्ती करेन. त्यांच्यासारख्या नेत्याची शिवसेनेलाही मदत होईल, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे कधीही संपणार नाहीत. राजकारणात एखादा अपघात होतो आणि त्या अपघाताने एखादा माणूस मागे पडतो. मात्र खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यांचं भवितव्य चांगलं आहे, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस अध्यक्ष करा- रामदास आठवले

कंगना रणौतसोबत माझं काही व्यक्तीगत भांडण नाही, पण…-संजय राऊत

अखेर कंगणा रणाैतचा सूर बदलला; म्हणाली, जय मुंबई, जय महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here