पुणे : सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, बढेकर ग्रुपचे अध्यक्ष प्रविण बढेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लेझीम पथकाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी खास वाढदिवसानिमित्त बनवलेली ग्रिटींग कार्ड प्रविण बढेकर यांना भेट दिली.
सदर शैक्षणिक वस्तू वाटपाचा कार्यक्रम उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन जयश्री कासार यांनी केले. सूत्रसंचालन दीप्ती भगत यांनी केले. विशाल चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मंदाकिनी बलकवडे, गीतांजली कांबळे, रणजित बोत्रे, विशाल चव्हाण उपस्थित होते.

