नवी दिल्ली : केंद्र सरकारने जीएसटी, नोटाबंदीसह, कृषी कायदे भारतात आणले. यावरून काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
नोटाबंदी, जीएसटी मुळे देशातील लक्ष्मी घटली. नव्या कृषी कायद्यामुळे दूर्गा शक्ती कमी झाली. विद्यालयात संघाची लोक बसवून सरस्वतीची शक्ती कमी झाली., असं राहुल गांधी म्हणाले. ते जम्मू काश्मिर मधील त्रिकुटानगरमध्ये काॅंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
दरम्यान, जे लोक स्वत:ला हिंदू म्हणून घेत होते त्यांनी लक्ष्मी, दूर्गा, आणि सरस्वतीचा अपमान केला आहे. ही लोकं मंदिरात डोकं टेकतात आणि त्यांची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न करतात, अशी उपरोधक टीका राहुल गांधींनी केली.
महत्वाच्या घडामोडी –
‘अडचणी आमच्या नाही तर, ठाकरे सरकारच्या वाढतील’; लूक आऊट सर्क्युलर नोटिसीवरुन नितेश राणेंचा इशारा
पवारांनी काँग्रेसचे चपखल वर्णन केलंं, आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की…; फडणवीसांचा टोमणा
‘…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्वागत करू’; नारायण राणेंची ‘त्या’ वक्तव्यावरून पलटी
“काँग्रेस पक्ष सध्या संकटात असला तरी, केंद्रात पुन्हा सोनियाचेच दिवस येणार आहेत”