आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांच्या विधानाचा जोरदार समाचार घेतला होता. आज पुन्हा एकदा उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या विधानाचा चांगला समाचार घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान सहन करण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी खंत उदयनराजेंनी यावेळी व्यक्त केली.
हे ही वाचा : राहुल गांधींवरील टीकेला आता काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, राज ठाकरेंनीच आपला मेंदू गहाण ठेऊन…
त्याकाळात शिवाजी महाराजांनी समाजाचा विचार केला. आज सर्व व्यक्तिकेंद्रीत झाले आहेत. कोणीच अपवाद नाही. राष्ट्रीय पक्ष असो की प्रादेशिक पक्ष. असंच चालत राहीलं तर कितपत चालणार. या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार?, असा सवालही उदयनराजेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
अरे गधड्या, सावरकरांवर बोलायची तुझी लायकी तरी आहे का?; राज ठाकरेंचा राहुल गांधींवर घणाघात
राज्यपाल पदावर बसलेत म्हणून मान राखतोय, नाहीतर…; राज ठाकरेंचा, भगतसिंग कोश्यारींवर हल्लाबोल
ब्रेकींग न्यूज! सावरकर प्रेमी शरद पोंक्षे यांनी घेतली शरद पवारांची भेट; तर्कवितर्कांना उधाण