मुंबई : कडक निर्बंध असताना अर्धवट शटर लावून आतमध्ये कटिंग, दाढी सुरू असल्याच्या संशयावरून केशकर्तनालय चालक फेरोजखानला पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत फेरोजखान याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहे. केशकर्तनालय उघडे ठेवले म्हणून पोलिसांनी औरंगाबादला प्राण जाईपर्यंत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. राज्यात अक्षरशः अराजक माजलं आहे,” असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहे.
केशकर्तनालय उघडे ठेवले म्हणून पोलिसांनी औरंगाबादला प्राण जाईपर्यंत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. राज्यात अक्षरशः अराजक माजले आहे. pic.twitter.com/o0mbeCfil2— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
ठाकरे सरकारकडून करोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी; किरीट सोमय्यांचा आरोप
राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे- चंद्रकांत पाटील
“शरद पवारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं”
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने एका रात्रीत काढता, लाज वाटली पाहिजे”